New Justice Statue : न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटली : हातात तलवारीऐवजी राज्यघटना !

नवी देहली – न्यायालयात डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवतेची मूर्ती आपण  पाहिली असेलच; पण ही पट्टी काढण्यात आली आहे. यासह तिच्या हातात तलवारीऐवजी राज्यघटना देण्यात आली आहे. तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, असे सरन्यायाधिशांचे मत आहे. न्यायालय हिंसाचाराद्वारे न्याय देत नाही, तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. दुसर्‍या हातातील तराजू योग्य आहे, जे प्रत्येकाला समान न्यायाचे प्रतीक आहे.

घटनात्मक कायद्यांनुसार न्याय

न्यायदेवतेची मूर्ती भारतात कोठून आली?

न्यायाची देवी ही एक प्राचीन ग्रीक देवी आहे, जी न्यायाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. तिचे नाव जस्टिया आहे. तिच्या नावावरून न्याय हा शब्द सिद्ध  झाला आहे. तिच्या डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीचाही अर्थ ‘न्यायदेवता नेहमी नि:पक्षपातीपणे न्याय देईल’, असा आहे.

ब्रिटीश अधिकार्‍याने हा पुतळा भारतात आणला

हा पुतळा ग्रीसमधून ब्रिटनला पोचला. १७ व्या शतकात ब्रिटीश अधिकार्‍याने तो  पहिल्यांदा भारतात आणला. हा ब्रिटिश अधिकारी न्यायालयात अधिकारी होता. १८ व्या शतकात ब्रिटीश काळात न्यायदेवीची मूर्ती सार्वजनिक वापरात आणली गेली. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर याच न्यायदेवतेचा स्वीकार करण्यात आला.