कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे भारतात औषधांचा तुटवडा !

पुढील आपत्काळात औषधेच मिळणार नाहीत, याविषयी अनेक संत वारंवार सांगत आहेत. लोकहो, अशा स्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही सिद्ध आहात का ?

माझ्यावर गुन्हे नोंद करण्यामागे राजकीय षड्यंत्र ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर बलात्कार करणे आणि धमकावणे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नाईक यांना अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता ! – आरोग्यमंत्री

कोरोनाची रुग्णसंख्या सध्या वाढत असतांना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे; मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका आहे. जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नवी मुंबईतील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू !

कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाठीवर गाठ आली असल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले होते.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड जंक्शनचा उड्डाणपूल पुढील १२ दिवस बंद !

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड जंक्शनचा उड्डाणपूल पुढील १२ दिवस बंद रहाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी १३ ते २४ मेपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील.

संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतियांनाच नव्हे, तर जगाला भुरळ घातली. जगभरात जेथे भारतीय संगीत पोचले आहे, तेथेे संतूर पोचले आहे, हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे.

गांधीवाद्यांनी महाराष्ट्र आणि देश यांची फसवणूक केली ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

गांधीवाद्यांनी महाराष्ट्र आणि देश यांची फसवणूक केली, असे वक्तव्य अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी केले. एस्.टी. कर्मचाऱ्यांची ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघ’ या संघटनेची स्थापनेच्या मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी वरील वक्तव्य केले.

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्या विरोधात राणा दांपत्याची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार !

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ९ मे या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकार आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात तक्रार केली.

शिवसेनेच्या नेत्यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला खडसावले !

वैद्यकीय नियमांनुसार ‘एम्.आर्.आय.’ काढण्याच्या कक्षात भ्रमणभाष नेता येत नाही. असे असतांना खासदार नवनीत राणा लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी गेल्या असतांना तेथील ‘एम्.आर्.आय.’ कक्षात त्यांची छायाचित्रे काढण्यात आली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून ३ जणांचा मृत्यू !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ‘प्रोपोलिन गॅस’चा टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. खोपोली येथील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.