Karnataka HC On Jai ShriRam : मशिदीत ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा दिल्‍याने धार्मिक भावना दुखावल्‍या जात नाहीत ! – कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

बेंगळुरू – मशिदीमध्‍ये ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा दिल्‍याच्‍या प्रकरणात आरोपींच्‍या विरोधात चालू असलेली फौजदारी कारवाई रहित करण्‍याचे निर्देश कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने दिले. मशिदीत ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा दिल्‍याने धार्मिक भावना दुखावल्‍या जात नाहीत, असे कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने त्‍याच्‍या आदेशात म्‍हटले आहे.

१. दक्षिण कन्‍नड जिल्‍ह्यातील रहिवासी असलेल्‍या २ व्‍यक्‍तींनी गेल्‍या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये एका रात्री स्‍थानिक मशिदीत प्रवेश केला आणि ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा दिल्‍या होत्‍या.

२. त्‍यानंतर स्‍थानिक पोलिसांनी त्‍यांच्‍यावर भारतीय दंड संहितेच्‍या २९५(अ) (धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे), ४४७ (गुन्‍हेगारी घुसखोरी) आणि ५०६ (धमकावणे) या  कलमांखाली गुन्‍हा नोंदवला होता. आरोपींनी त्‍यांच्‍यावरील आरोप रहित करण्‍याची मागणी करत उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली.

३. कर्नाटक सरकारने याचिकाकर्त्‍यांच्‍या याचिकेला विरोध केला आणि या प्रकरणात अधिक अन्‍वेषणाची आवश्‍यकता असल्‍याचे सांगून त्‍यांच्‍या कोठडीची मागणी केली; मात्र  ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा दिल्‍याने सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला नसल्‍याचे नमूद करत उच्‍च न्‍यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.