सासवड (जिल्हा पुणे) येथील मतदान यंत्र चोरी प्रकरणातील ३ अधिकार्‍यांचे निलंबन रहित !

निलंबन रहित होऊन कामावर रुजू झालेल्या अधिकार्‍यांनी पुन्हा मतदान यंत्रांची चोरी केली, तर त्याला उत्तरदायी कोण ?

पोलिसांच्या अन्वेषणात एवढा विलंब का ? – सात्यकी सावरकर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण केले जात आहे; परंतु या अन्वेषणात विलंब होत असल्याची तक्रार सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केली आहे.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) नगरपरिषदेचा पाण्याचा बंब दुरुस्त न केल्यास आंदोलन करणार ! – संतोष परब, युवासेना

अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद ! असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?

देशातील सर्व मंदिरे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त करून मंदिरांच्या संपत्तीचा वापर धर्मप्रसारासाठी करावा ! – मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद

देशातील एकही चर्च किंवा मशीद शासनाच्या नियंत्रणात नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांवर शासनाचे नियंत्रण आहे. यासाठी अशी मागणी केली

पदवी परीक्षेत हिंदी विषयाच्या २ पॅटर्न पेपरला दिल्या समान प्रश्नपत्रिका !

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या गलथान कारभारामुळे पदवी परीक्षेत ३ एप्रिल या दिवशी गोंधळ उडाला.

पिण्याच्या पाण्यासाठी जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !

Corruption In Goa Elections : निवडणुकीतील आर्थिक गुन्हे रोखणार्‍या पथकातील दोघे भ्रष्टाचारामुळे निलंबित

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?

पुणे येथे १५ वर्षांपेक्षा जुनी लाखो वाहने पुनर्नोंदणी न करता अवैधरित्या रस्त्यावरून धावत आहेत !

कायद्याचा धाक नसणारी जनता निर्माण करणारे आजपर्यंतचे शासनकर्ते ! आतातरी प्रशासनाने कायद्यानुसार वागण्याची इच्छाशक्ती वाढवणे आवश्यक आहे !

निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणी बारामतीत विस्तार अधिकार्‍यावर गुन्हा नोंद !

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सी व्हिजिल ॲप’वर आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करता विनाअनुमती मुख्यालय सोडणे, उपविभागीय अधिकार्‍यांनी विचारणा केल्यावर त्यांना उर्मट उत्तर दिल्याची घटना बारामतीत घडली आहे.

लाच मागितल्याप्रकरणी थेऊरच्या (पुणे) विजय नाईकनवरे यांच्यावर दुसर्‍यांदा गुन्हा नोंद !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग ! लाच प्रकरणामध्ये केवळ गुन्हा नोंद करून काही उपयोग होत नाही, हे दर्शवणारी घटना ! लाचप्रकरणी सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला लगेचच शिक्षा होणे आवश्यक आहे !