थेऊर (जिल्हा पुणे) – खरेदी केलेल्या शेतभूमीची सातबारा उतार्यावर नोंद आणि फेरफार संमत करण्यासाठी ८० सहस्र रुपयांची लाच मागणार्या विजय नाईकनवरे या मध्यस्थाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मध्यस्थाने थेऊरच्या तत्कालिन मंडल अधिकार्यांसाठी लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केलेल्या अन्वेषणामध्ये उघड झाले आहे. या प्रकरणी ६५ वर्षीय शेतकर्याने तक्रार केली होती. विजय नाईकनवरे याच्यावर २० दिवसांपूर्वीच लाच प्रकरणामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे.
संपादकीय भूमिका :भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग ! लाच प्रकरणामध्ये केवळ गुन्हा नोंद करून काही उपयोग होत नाही, हे दर्शवणारी घटना ! लाचप्रकरणी सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला लगेचच शिक्षा होणे आवश्यक आहे ! |