देशातील सर्व मंदिरे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त करून मंदिरांच्या संपत्तीचा वापर धर्मप्रसारासाठी करावा ! – मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद

श्री. मिलिंद परांडे

सोलापूर – देशातील एकही चर्च किंवा मशीद शासनाच्या नियंत्रणात नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांवर शासनाचे नियंत्रण आहे. सर्व मंदिरे शासन नियंत्रणातून मुक्त करून या मंदिरात मिळणार्‍या दानातून धर्मप्रसाराचे कार्य व्हावे, अशी मागणी श्री. मिलिंद परांडे, अखिल भारतीय महामंत्री संघटक, विश्व हिंदु परिषद यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तरुणांसाठी आयोजित अभ्यासवर्गाला भेट दिल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी श्री. विजयकुमार पिसे आणि श्री. पुरुषोत्तम उडता हे उपस्थित होते.

परांडे पुढे म्हणाले की, दुर्गा वाहिनी आणि महिला समितीच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रतिबंध घालण्याचे प्रयत्न चालू आहेत, तसेच तज्ञ व्यक्तींचे साहाय्य घेऊन लव्ह जिहादविरोधी कायद्याचा मसुदा बनवण्यात आला आहे. हा कायदा लवकरात लवकर व्हावा, यासाठी प्रयत्नशील रहाणार आहोत.

महिला आणि युवती यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न !

प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. आपण मतदान केले नाही, तर चुकीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. म्हणून येत्या निवडणुकीत महिला आणि युवती यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे परांडे यांनी या वेळी सांगितले.