बजरंग दलाचे इचलकरंजी प्रांताधिकार्यांना निवेदन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – हिंदुस्थान हा बहुसंख्य हिंदू असलेला देश आहे. येथे सर्व धर्मीय लोक गुण्या-गोविंदाने रहातात. असे असतांना सहिष्णू हिंदूंवर आता धर्मांध मुसलमानांकडून भ्याड आक्रमण करण्याचे प्रमाण वाढले आहे. ३१ जानेवारीला शालेय विद्यार्थी बसमधून जात असतांना त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या म्हणून धर्मांध मुसलमान जमावाने त्यांच्यावर दगडफेक करून दहशत माजवली. या दगडफेकीत शालेय विद्यार्थी घायाळ झाले आहेत. तरी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांवर आक्रमण करणार्यांवर प्रशासनाने देशद्रोहाचे गुन्हे नोंद करावेत, या मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांनी स्वीकारले.
याप्रसंगी जिल्हा संयोजक श्री. अमित कुंभार, जिल्हामंत्री श्री. सुजित कांबळे, सर्वश्री बाळासाहेब ओझा, मुकेश चोथे, विशाल माळी, हरिष पसनूर यांसह अन्य उपस्थित होते.