सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याविषयी खोटी माहिती प्रसारित करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी !

पाचगणी (जिल्हा सातारा) – सामाजिक माध्यमांवर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची चुकीची माहिती प्रसारित करणार्‍या समाजकंटकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मालुसरे परिवार रस्त्यावर येईल, अशी चेतावणी ‘सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे राज्य संस्थे’च्या वतीने देण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन पाचगणी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्याकडे देण्यात आले आहे.

निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रमुख सरदार तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि रघुजी आंग्रे यांच्या जातीचा चुकीचा उल्लेख करत सामाजिक माध्यमांमध्ये अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी खोटी माहिती पसरवून जातीय द्वेष निर्माण करणे, खोटा इतिहास प्रसिद्ध करणे, अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण मालुसरे परिवार नव्हे, तर सर्व मराठा समाजामध्ये संताप पसरला आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?