तिहार कारागृहात ‘आप’च्या मंत्र्याला विशेष वागणूक !

कारागृहात त्यांना मालिश केले जात असल्याचे सीसीटीव्हीचे चित्रण असलेला व्हिडिओ आता भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. यानंतर आम आदमी पक्षाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

गोव्यात वर्ष २०२४-२५ पासून ‘जीसीईटी’ परीक्षा नाही : प्रवेशासाठी ‘जेईई मेन’ परीक्षा अनिवार्य

राज्यातील अभियांत्रिकी आणि ‘फार्मसी’ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आता राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई मेन’ परीक्षेत मिळणार्‍या गुणांच्या आधारावर या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. तंत्रशिक्षक संचालनालयाने यासंबंधी सूचना प्रसिद्ध केली आहे.

शिक्षण हा नफा कमावण्याचा व्यवसाय नव्हे ! – सर्वोच्च न्यायालय

आंध्रप्रदेश सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क २४ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाला आंध्रप्रदेशन उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

पुणे शहरात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने दात्यांना रक्तदान करण्याचे रक्तपेढ्यांचे आवाहन

सध्या शहरामध्ये डेंग्यूचा फैलाव होत आहे. त्यामुळे त्या रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक ‘प्लेटलेट’ आणि इतर रक्तघटकांना असलेली मागणी वाढली आहे; परंतु शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेला रक्ताचा साठा पुरेसा नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे.

यजमानांच्या आजारपणाच्या वेळी रुग्णालयात आलेले कटू अनुभव !

कर्मचार्‍यांनी शस्त्रकर्मासाठी ‘स्किन स्टेप्लर’ मागवण्यास सांगणे, त्याचा वापर न करणे आणि तो परतही न करणे

नागपूर येथे जाब विचारला म्हणून गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या प्रभागातून हाकलले !

गर्भवतीची वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उघड्यावर प्रसूती !

वाराणसीमध्ये रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाण : उपकरणांची तोडफोड

सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक !

देशात प्रथमच मध्यप्रदेशात हिंदीतून वैद्यकीय शिक्षण मिळणार !

जे स्वातंत्र्यानंतर व्हायला हवे होते, ते आता कुठेतरी चालू होत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

डॉ. निखिल सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार !

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर या दिवशी राखून ठेवला.

जीवन संजीवनी प्रशिक्षणाने जीव वाचवणे शक्य ! – डॉ. किरण भिंगार्डे, भूलतज्ञ

डॉ. किरण भिंगार्डे म्हणाले, ‘‘मी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिले, अशा प्रशिक्षण घेतलेल्यांनी २६ जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे या ज्ञानाचा उपयोग प्रत्येकाने योग्य वेळी करणे आवश्यक आहे.’’