सुविधांअभावी त्रास होऊन वडजी येथील महिलेची रस्‍त्‍यातच प्रसूती !

वैजापूर तालुक्‍यातील वडजी येथील महिला रिजवाना शाकीर पठाण या महिलेला ३० एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता प्रसूती कळा येत असल्‍याने लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात भरती करण्‍यात आले; मात्र वैजापूर येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात १२ घंट्यांनंतर साधारण प्रसूती होणार नसल्‍याचे सांगण्‍यात…

आधुनिक वैद्यांचे तात्पुरते स्थानांतर करण्यावर यापुढे बंदी !

वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या तात्पुरत्या स्थानांतरांवर कायमचे निर्बंध घालण्याचा आदेश संभाजीनगर खंडपिठाने दिला होता. त्यानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीय शिक्षण संस्थांना हे निर्देश दिले आहेत.

आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना समान वेतन लागू करता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देता येत नाहीत, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

भारतातील आरोग्य सुविधा उत्कृष्ट ! –  जी-२० च्या प्रतिनिधी डॉ. कॅरीन कॅलींडर

भारत देशात कर्मचारी महिला, शिशु आणि मुलांचे आरोग्य अन् त्यांची निकोप वाढ यांसाठी देत असलेले महत्त्व, घेत असलेली काळजी पाहून मी प्रभावित झाले. सार्वजनिक आरोग्य सुविधा वाढवण्यासंदर्भात भारताकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे.

बनावट औषधांच्या प्रकरणी कर्नाटकमध्ये २५ आस्थापने काळ्या सूचीत !

बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे पुरवणार्‍या २५ पेक्षा अधिक औषधनिर्मिती आस्थापनांना काळ्या सूचीत टाकण्याचा आदेश ‘कर्नाटक राज्य वैद्यकीय पुरवठा निगम’ने दिला.

डोळ्यांचे आरोग्य आणि वाढता ‘स्क्रीन टाइम’

दिवस-रात्र स्क्रीनच्या म्हणजेच प्रखर उजेडाच्या समोर राहिल्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. या कृत्रिम; परंतु घातक अशा किरणोत्सर्गाच्या उष्णतेपासून रक्षण होणे आवश्यक ठरते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी करावयाच्या कृती या लेखात पाहूया.

कंटकारी (रानवांगे)

‘रानवांगे या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये ‘कंटकारी’ असे म्हणतात. कंटकारीचे मूळ, पान, फूल, फळ आणि खोड यांचा चिकित्सेमध्ये वात अन् कफ यांच्या विकारांमध्ये चांगला उपयोग होतो; मात्र याच्या काट्यांपासून सांभाळावे लागते.

सर्दीमुळे कानांत दडे बसल्यास ते दूर होण्यासाठीचा सोपा उपाय

सर्दीमुळे किंवा थंड वारा लागल्याने रुग्णाच्या कानांत दडे बसून ते दुखू लागल्यास, लालबुंद निखार्‍यांवर हळद घालून त्यातून येणारा गरम धूर कानांत जाईल, अशी व्यवस्था करावी.

सायंकाळचे जेवण सूर्यास्तापूर्वी अथवा त्यानंतर लवकरात लवकर का करावे ?

‘सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण केल्याने अन्न पचनासाठी सूर्याकडून ऊर्जा मिळते. अन्न पचन होण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो. सायंकाळी घेतलेल्या आहाराचे दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत पूर्णतः पचन होते. परिणामी मल प्रवर्तन योग्य वेळी होण्यासाठी साहाय्यक ठरते.

छत्रपती संभाजीनगर येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !

राज्यासमवेत शहरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतांनाच संशयित रुग्णांची कोरोना चाचणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.