रात्रीचे जेवण पुष्कळ उशिरा ग्रहण का करू नये ?’

वैद्य समीर मुकुंद परांजपे

१. ‘रात्रीचे जेवण जेवढे उशिरा ग्रहण होईल, तेवढा जठराग्नीवर अधिक ताण येतो. त्याचा पचनसंस्थेवर दुष्परिणाम होतो.

२. रात्री उशिरा जेवल्यानंतर अन्य कोणत्याही कृती (हालचाल) न करता थेट झोपले जाते.

३. याचा परिणाम म्हणून शरिरातील कफ दोष वाढून अजीर्ण होणे, वजन वाढणे, सकाळी उठल्यावर अजीर्णामुळे चेहर्‍यावर सूज येणे, डोळे जड होणे आदी लक्षणे निर्माण होतात.

४. शरिराची सकाळची सर्व तंत्रे (मल प्रवर्तन आणि भूकेची जाणीव होणे इत्यादी) बिघडतात.

वरील सर्व दिनचर्येतील केवळ एका अयोग्य कृतीमुळे होते आणि ते म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात. औषधांची आवश्यकता भासत नाही; म्हणून योग्य वेळी आहार घेऊन रोगमुक्त जीवन जगा !’

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१४.१२.२०२२)

(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])