नवी मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – कामावर गैरवर्तन केल्याप्रकरणी करार पद्धतीवरील लिपिकाची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली. संजय मुरबाडे असे या लिपिकाचे नाव आहे. मुरबाडे हे वर्ष २०१२ पासून लिपिक म्हणून करार पद्धतीवर तुर्भे येथील नागरी आरोग्य केंद्र येथे कार्यरत होते. त्यांच्याकडे बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना ‘केसपेपर’ देणे, त्याचे शुल्क घेऊन ते प्रतिदिन विभाग कार्यालयातील लेखा विभागात भरणे असे काम होते; मात्र मुरबाडे यांनी ६ मास जमा झालेले शुल्क विभाग कार्यालयातील लेखा विभागात जमा केले नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी तुर्भे नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांनी संजय मुरबाडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
त्यांच्याकडून जमा झालेले ६२ सहस्र रुपये शुल्क वसूल करण्यात आले. त्यानंतर पदाचा दुरुपयोग करून गैरवर्तन केल्याने त्यांची सेवा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समाप्त करण्याचे आदेश दिले.
संपादकीय भूमिकाअशा कर्मचार्यांना कडक शासन झाल्यास अन्य कुणी असे करण्यास धजावणार नाहीत ! |