आईच्या गर्भाशयातच बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आधुनिक वैद्य यशस्वी !

देहली – एका महिलेच्या गर्भाशयातच तिच्या बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात येथील एम्स रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना यश आले आहे. शस्त्रक्रियेनंतर आई आणि तिचे बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या महिलेचा तीन वेळा गर्भपात झाला आहे. ही महिला पुन्हा गरोदर राहिली; परंतु तिच्या गर्भात असलेल्या बाळाच्या हृदयाविषयी  आधुनिक वैद्यांना काही समस्या जाणवल्या. याची माहिती त्यांनी त्वरीत संबंधित महिलेला आणि तिच्या पतीला दिली. त्या वेळी या महिलेने गर्भ ठेवण्याचा निर्णय घेतला आणि पुढील वैद्यकीय प्रक्रिया करण्यास आधुनिक वैद्यांना अनुमतर दिली. ही शस्त्रक्रिया ‘डिजिटल’ स्वरूपाची असून तिला ‘बॅलूक डायलेशन’ असे म्हटले जाते. आधुनिक वैद्यांनी म्हटले की, अशा प्रक्रिया अत्यंत किचकट असतात. यात गर्भाच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो.