मकरसंक्रांतीच्या शुभदिनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराला आरंभ केल्यावर गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसाराच्या कार्यास पुन्हा प्रारंभ केला आहे. यानिमित्त साधकांनी गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना . . .

नंदुरबार येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून पोलिसांकडून ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मोहरम आदी प्रसंगी निघणार्‍या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करून अजान देणार्‍या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !

मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !

मकरसंक्रतीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे पू. अधिवक्ता हरिशंकर जैन, अधिवक्ता आर्. वेंकटरमणी आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.

मकरसंक्रांत

हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी प्रति ८० वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी आहे.

आपत्काळातील मकरसंक्रांत कशी साजरी करावी ?

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले काही मास सण-उत्सव साजरे करण्यास किंवा व्रते आचरण्यात काहीसे निर्बंध होते. कोरोनाची परिस्थिती अद्याप निवळली नसली, तरी ती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अशा वेळी सण साजरे करतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.