पोलीस महासंचालकपदाच्‍या नियुक्‍तीचे ‘ट्‍वीट’ मुनगंटीवार यांच्‍याकडून ‘डिलीट’ !

प्रत्‍यक्षात राज्‍याच्‍या गृहविभागाकडून रश्‍मी शुक्‍ला यांची नियुक्‍ती केल्‍याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्‍याचे लक्षात येताच सुधीर मुनगंटीवार यांनी हे ‘ट्‍वीट’ ‘डिलीट’ केले

मराठा आरक्षणाविषयी न्‍यायालयीन प्रक्रियेची माहिती देण्‍यासाठी शंभूराज देसाई यांनी घेतली उदयनराजे यांची भेट !

खासदार उदयनराजे भोसले म्‍हणाले, ‘‘आज मराठा समाजाची अवस्‍था वाईट आहे. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्‍यांनी इतके वर्ष आरक्षण का दिले नाही

विधी आणि न्‍याय विभागाकडून उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा सल्ला; मात्र कार्यवाहीस दिरंगाई !

तत्‍कालीन महाविकास सरकारच्‍या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता; मात्र या वेळी महाराष्‍ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

परराज्‍यात गेलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या श्‍वेतपत्रिकेविषयी उत्तर द्यावे ! – माधव भांडारी, भाजप प्रदेश उपाध्‍यक्ष

फॉक्‍सकॉन, एअरबस, सॅफ्रन आणि बल्‍क ड्रग पार्क प्रकल्‍पांच्‍या गुंतवणूकदारांकडे कोणत्‍या मागण्‍या केल्‍यामुळे हे प्रकल्‍प राज्‍याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांनी द्यावे

माजी महापौरांसह अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

मुंबईत शवपिशव्या खरेदी घोटाळा प्रकरण

विरोधी पक्षनेत्‍याविना विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देऊन १५ दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्‍याची निवड झालेली नाही. त्‍यामुळे विरोधी पक्षनेत्‍याविनाच विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.

विधान परिषदेच्‍या १२ सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीवरील स्‍थगिती सर्वोच्‍च न्‍यायालयाने उठवली !

महाराष्‍ट्राच्‍या विधान परिषदेच्‍या १२ सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीवरील स्‍थगिती सर्वोच्‍च न्‍यायालयाने उठवली आहे. ११ जुलै या दिवशी न्‍यायमूर्ती चंद्रचूड यांच्‍या खंडपिठापुढे याविषयीची सुनावणी झाली. 

विधानसभेच्‍या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचा दावा !

अजित पवार यांनी सत्तेत असलेल्‍या भाजप-शिवसेना यांना पाठिंबा दिल्‍यामुळे विरोधी पक्षातील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या आमदारांची संख्‍या घटली आहे. त्‍यामुळे अजित पवार यांनी त्‍यागपत्र दिल्‍यामुळे रिक्‍त झालेल्‍या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे.

औरंगजेबाच्‍या मजारच्‍या संरक्षित स्‍मारकाचा दर्जा काढण्‍याचे धैर्य दाखवा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

औरंगजेबाच्‍या विषयावरून राजकारण करण्‍यापेक्षा औरंगजेबाच्‍या ज्‍या चुकीच्‍या गोष्‍टी आहेत, त्‍या समाजातून हटवल्‍या पाहिजेत. 

राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेले ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ ला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहे, कारण या लोकांचा राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेला आहे.