छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद !

असे गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांना निवडून द्यायचे कि नाही, हे जनतेने ठरवावे. असे उमेदवार निवडून आले तरी ते खर्‍या अर्थाने मतदारसंघाचा विकास घडवून आणू शकतील का ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर कोल्हापूर येथे गुन्हा नोंद !

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ विनापरवाना रॅली आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

सांगली येथे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक !

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्याचे सर्व नेते आणि पदाधिकारी यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन ‘महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडणे हा निर्णय आपल्याला पचनी पडलेला नाही’, असे म्हटले आहे.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून विद्यार्थ्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत असल्याचा महायुतीचा आरोप !

महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची धमक नसल्यानेच महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांवर आरोप करत महायुतीच्या नेत्यांनी संस्थाचालक आणि प्राचार्यांना सुनावले.

संजय निरूपम यांच्याकडून काँग्रेसचे त्यागपत्र !

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून संजय निरूपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती; मात्र ही जागा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली.

जागावाटपाविषयी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा !

जागावाटपाविषयी ६ मार्च या दिवशी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीपूर्वी धोरणात्मक निर्णयाच्या दृष्टीने दोघांत चर्चा झाली.

विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ – आशिष शेलार, आमदार, भाजप

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन साहाय्य करणार, सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करणार, अशा घोषणा तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्या काळात केल्या, त्याचे काय झाले ? याचे उत्तर आधी द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावेत, अशी टीका त्यांनी केली विधानसभेत केली.

वारंवार होणार्‍या पेपरफुटीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याची मागणी !

राज्यात वारंवार होणार्‍या पेपरफुटीच्या प्रकरणी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केले. यामध्ये १० ते १२ आमदार सहभागी झाले होते.

निखिल वागळे यांच्या निर्भय सभेविरुद्ध भाजपची पुणे येथे निदर्शने !

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी भाषणाला अनुमती नाकारावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच देवधर यांनीही पुणे पोलिसांकडे केली.

वर्ष २०२१ मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटील याची चौकशीच झाली नाही ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

१२ डिसेंबर या दिवशी ड्रग्ज तस्कर ललित पाटील संदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.