मुंबईत शवपिशव्या खरेदी घोटाळा प्रकरण
(शवपिशव्या म्हणजे मोठी प्लास्टिक पिशवी, जी मृतदेहाला वाहून नेण्यासाठी वापरली जाते.)
मुंबई – कोरोनाच्या काळात कोरोनाबाधितांचे मृतदेह नेण्यासाठी २ सहस्र रुपयांपर्यंत किंमत असलेल्या शवपिशव्या ६ सहस्र ८०० रुपयांना खरेदी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मुंबईच्या माजी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांसह २ अधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मोठी बातमी : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा, कोव्हिड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदीत घोटाळ्याचा आरोपhttps://t.co/Wc4UT6xIeo #KishoriPednekar #Mumbai #BMC #CovidCentreScam
— Maharashtra Times (@mataonline) August 5, 2023
या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण चालू आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून याविषयी आरोप करण्यात आला होता. यामध्ये सौ. किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून २१ जून या दिवशी धाड टाकली होती.