मुंबई – राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन करणारे ट्वीट केले होते. प्रत्यक्षात राज्याच्या गृहविभागाकडून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचे लक्षात येताच सुधीर मुनगंटीवार यांनी हे ‘ट्वीट’ ‘डिलीट’ केले; मात्र या ‘ट्वीट’चा ‘स्क्रीनशॉट’ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना सत्तेतील काही नेत्यांचे दूरभाष मुद्रित (फोन टॅपिंग) केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडून त्यांच्या विरोधातील गुन्हा रहित करण्यात आला. नुकतीच रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.