उत्पन्न वाढीसाठी बसस्थानकांच्या जागा भाड्याने देण्यासाठी एस्.टी. महामंडळ सर्वेक्षणाच्या सिद्धतेत !

आर्थिक स्थिती खालावल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी एस्.टी. महामंडळाकडून प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत बसस्थानकांच्या मोक्याच्या कोणत्या जागा भाड्याने देता येतील ? याविषयी सर्वेक्षण चालू आहे.

सोलापूर बसस्थानकात बसगाड्यांची कोंडी !

सांगली, लातूर, कोल्हापूर, कोकण, पुणे यांसह कर्नाटक येथे जाणार्‍या बसगाड्या मोठ्या प्रमाणात सोलापूर बसस्थानकातून जातात. याचसमवेत पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर येथील तीर्थक्षेत्रांना जाणार्‍या बसगाड्यांची संख्याही अधिक आहे.

२२ एप्रिलपासून एस्.टी. बस पुन्हा पूर्ण क्षमतेने धावणार !

नोव्हेंबर २०२१ पासून एस्.टी.च्या कामगारांनी संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठरणारी एस्.टी. बस ठप्प झाली होती; मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत ७० सहस्र कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू !

सर्वाेच्च न्यायालयाने एस्.टी. कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू झाल्या आहेत. आगारातील ६५८ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प झालेली एस्.टी.ची सेवा चालू होण्याचा मार्ग मोकळा

वैद्यकीय तपासणी केल्यावर आणि प्रशिक्षण दिल्यावर कर्मचारी सेवारत होणार

अकोला येथील आरोपी अजय गुजर याला संभाजीनगर येथे अटक, तर दुसरा आरोपी पोलिसांना शरण !

एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकरण

शरद पवार यांच्या घरावर आक्रमण करणाऱ्या एस्.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय ! – अनिल परब, परिवहनमंत्री

राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी परब म्हणाले की, अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी एस्.टी.च्या कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत.

एस्.टी.चे खरे मारेकरी कोण ?

सर्वसामान्य जनता खासगी वाहतुकीकडे वळत आहे. याला कारण एस्.टी. महामंडळाचा गलथान कारभार आणि स्वार्थी राजकारण आहे. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन करतांना राजकारण्यांनी प्रथम एस्.टी. महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन द्यावे. तसे झाले, तर अशी वेळ येणार नाही, हे निश्चित !

एस्.टी. समोरील आव्हाने आणि तिच्या सक्षमीकरणाची आवश्यकता !

देशांतर्गत सक्षम आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था असणे अनिवार्य आहे. एस्.टी.च्या संदर्भात आंदोलने चालूच आहेत, तर एस्.टी.ची सर्वच यंत्रणा कालसुसंगत होण्यासाठीही पावले उचलली गेली पाहिजेच ! एस्.टी.शी जनसामान्यांची जोडली गेलेली नाळ येथून पुढेही अतूट रहाण्यासाठी जनसामान्यांनी आवाज उठवणे, हे त्यांचे सामाजिक कर्तव्यच आहे !’

एस्.टी. महामंडळाच्या ‘विठाई’ बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवणार !

एस्.टी. महामंडळाच्या विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकणे, मळ लागणे असे प्रकार होत असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.