७० सहस्र कर्मचारी कामावर रुजू झाले
मुंबई – नोव्हेंबर २०२१ पासून एस्.टी.च्या कामगारांनी संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठरणारी एस्.टी. बस ठप्प झाली होती; मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत ७० सहस्र कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. उच्च न्यायालयाने कर्मचार्यांना २२ एप्रिलपर्यंत कामाच्या ठिकाणी उपस्थित रहाण्याचे आदेश दिले होते. कामगारांची पूर्तता होत असल्याने २२ एप्रिलपासून एस्.टी. बस पुन्हा पूर्ण क्षमतेने धावणार आहे. संपाच्या काळात दुर्गम भागात रहाणारे नागरिक आणि विद्यार्थी यांना पुष्कळ मनस्ताप भोगावा लागला. आता एस्.टी. बस चालू झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळेल.