मनसेचे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक !

मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे, तसेच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचे साहित्यही जप्त केले आहे.

राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा (जिल्हा सांगली) प्रथमवर्ग न्यायालयाचा अटक वॉरंट !

राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारला.

आवश्यकता वाटल्यास राज ठाकरे यांच्यावर कारवाई करणार ! – पोलीस महासंचालक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचे अन्वेषण संभाजीनगरचे पोलीस आयुक्त करणार असून आवश्यकता वाटल्यास त्यांच्यावर आजच कारवाई करण्यात येईल. याविषयीची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी ३ मे या दिवशी दिली.

राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे या दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेतील १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यासह आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राज ठाकरे यांच्या सभेची गर्दी पाहून गुदमरून मराल ! – अविनाश जाधव, नेते, मनसे

भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘राज ठाकरे यांना संविधान भेट देण्यात येईल’, असे सांगून पोलिसांनी घालून दिलेल्या १६ अटींचे उल्लंघन केल्यास सभा उधळून लावण्यात येईल, अशी चेतावणी दिली होती.

… अन्यथा ४ मेपासून हनुमान चालिसा दुप्पट आवाजाने लावणारच !

महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच.

पुण्यात अक्षय्य तृतीयेला होणार्‍या मनसेच्या महाआरतीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील सर्व मंदिरांत ३ मे या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेला महाआरती करण्यात येणार असून त्यामध्ये मनसैनिकांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्यासह संलग्न असलेल्या ७ ते ८ संघटना कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

राज ठाकरे यांना संभाजीनगर येथील सभेसाठी पुण्यातील पुरोहितांकडून आशीर्वाद !

रोहितांनी शंख वाजवून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही मंत्रांचे १५ मिनिटे पठण केले. वेदमंत्र पठण चालू असतांना राज ठाकरे यांनी महाआरती केली.

८ जून या दिवशी संभाजीनगर येथे त्याच जागी शिवसेनेची प्रत्युत्तर सभा !

‘भाजप आणि विरोधक यांच्यावर तुटून पडा’, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिल्या.

राज ठाकरे यांच्या सभेच्या सिद्धतेला वेग, मनसे शिष्टमंडळाची संभाजीनगर येथील पोलिसांशी चर्चा !

सभेसाठी १५ सहस्र लोकांची मर्यादा पाळणे कठिण ! – बाळा नांदगावकर, मनसे नेते