५० अधिवक्त्यांकडून राज ठाकरे यांची भेट !
मनसेच्या जनहित आणि विधी विभागाचे सरचिटणीस अधिवक्ता किशोर शिंदे यांनी भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना अधिवक्त्यांनी केलेल्या सहकार्याची माहिती या वेळी दिली.
मनसेच्या जनहित आणि विधी विभागाचे सरचिटणीस अधिवक्ता किशोर शिंदे यांनी भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना अधिवक्त्यांनी केलेल्या सहकार्याची माहिती या वेळी दिली.
कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच अत्यंत विलंबाने होत असलेल्या पाणी समस्येवर महापालिका आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यावर ताशेरे ओढले. शहरातील ५५ प्रभागांतून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलते करणार आहेत.
राज ठाकरे यांना यापूर्वीच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने ही सुरक्षा तशीच ठेवत पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. यामध्ये एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. याविषयी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ११ मे या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयीची तक्रार केली.
देशाचे सर्वाेच्च न्यायालय आणि विविध राज्यांतील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांवर कार्यवाही व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन घोषित केले. आंदोलन करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली.
हनुमान चालिसा प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यावर पसार होऊन अटकेनंतर जामीन मिळालेले मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना साहाय्यक पोलीस आयुक्तांनी १० दिवसांसाठी तडीपार केले आहे.
मनसचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे संतोष धुरी यांच्या जामिनाच्या अर्जावर १७ मे या दिवशी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश उपस्थित राहू न शकल्यामुळे १० मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात या जामिनावर सुनावणी होऊ शकली नाही.
उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची मोर्चा काढून मागणी
नाशिक येथे भोंग्यांच्या विरोधी आंदोलनात ठिकठिकाणी मशिदींसमोर ध्वनीक्षेपकांवर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना अटक केली होती.