राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित !

मुंबई, २० मे (वार्ता.) – राज ठाकरे यांचा ५ जून या दिवशी होणारा अयोध्या दौरा रहित करण्यात आला आहे. २० मे या दिवशी ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित’, असे राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे.

या ‘ट्वीट’ मध्ये ‘महाराष्ट्र सैनिकांनो, या ! यावर सविस्तर बोलूच’, असे नमूद करत २२ मे या दिवशी पुणे येथे होणार्‍या स्वत:च्या सभेचा पत्ता देण्यात आला आहे.