‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या आक्रमणात पाकचे ५ सैनिक ठार

अशा आक्रमणामुळे पाक जगामध्ये ‘आम्हीही आतंकवादग्रस्त देश आहोत’, अशी ओरड करतो ! मात्र अशी आक्रमणे त्याच्याच कर्माची फळे आहेत, हेही जगाला ठाऊक आहे. अशा आतंकवादी संघटनांमुळेच पुढे पाकचे तुकडे झाल्यास आश्चर्य वाटू नये !

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान येथे २ ऑक्टोबरला तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (‘टीटीपी’) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये पाकच्या सुरक्षादलाचे ५ सैनिक ठार झाले. २ दिवसांपूर्वीच पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत ‘टीटीपी’च्या एका कमांडरला ठार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ‘टीटीपी’ आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये चर्चा चालू असल्याचे म्हटले गेले होते. ‘टीटीपी’ने शस्त्रसंधी लागू केली’, असे वृत्त पाकमधील माध्यमांनी प्रकाशित केले होते; मात्र ‘टीटीपी’ने हे वृत्त फेटाळून लावले होते.