आसाममध्ये धर्मांधांनी केलेल्या हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला अटक !

  • धर्मांधांचा भरणा असलेली काँग्रेस ! हिंदूंच्या मुळावर उठलेल्या काँग्रेसवर बंदी घाला !
  • हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
आमदार शर्मन अली अहमद

गौहत्ती (आसाम) – गेल्या आठवड्यात दरांग जिल्ह्यात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. या पार्श्वभूमीवर ‘वर्ष १९८३ मध्ये दरांग जिल्ह्यात धर्मांधांनी ८ बोडोंची (हिंदु आदिवासींमधील एक जमातीतील लोकांची) केलेली हत्या योग्य होती’, असे हिंदुद्वेषी विधान काँग्रेसचे धर्मांध आमदार शर्मन अली अहमद यांनी केले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

वर्ष १९८३ मध्ये आसाममध्ये धर्मांधांनी हत्या केलेल्या या हिंदूंना ‘हुतात्मा’ संबोधले जाते; मात्र  शर्मन अली अहमद यांनी ‘ठार झालेले हुतात्मा नव्हते, तर खुनी होते. हे ८ जण मिया समाजाच्या (बंगाली भाषा बोलणार्‍या मुसलमानांच्या) हत्येस उत्तरदायी आहेत’ असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या विधानानंतर काँग्रेसने अहमद यांना नोटीस बजावली होती. (या विधानामुळे काँग्रेसला विरोध होणार, हे लक्षात घेऊन काँग्रेसने ही तोंडदेखली कारवाई केली आहे. काँग्रेसला जर हिंदूंविषयी खरेच काही वाटत असते, तर एव्हाना पक्षाने अहमद यांना पक्षातून काढून टाकले असते ! – संपादक)