अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन !

महाविकास आघाडी सरकार महिला अत्याचाराविरुद्ध कुठलीही भक्कम कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीस साहाय्य करण्याचा यळगुड (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषिपूरक सेवा संस्थेचा ठराव !

विशाळगडाचे जतन व्हावे यासाठी कृती समितीस सर्वाेतोपरी साहाय्य करण्याचा ठराव संस्थेने केला आहे.

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने ‘चेतना संस्था’ येथील गतिमंद मुलांच्या शाळेला स्वच्छता साहित्य भेट !

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘चेतना संस्था’ येथील गतिमंद मुलांच्या शाळेला २३ सप्टेंबरला स्वच्छता साहित्य भेट देण्यात आले.

नवीन मतदार नाव नोंदणी अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ! – कुबेरसिंह राजपूत, शिवसेना

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचे नाव मतदारसुचीत येण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान ३० सप्टेंबरअखेर चालू असणार आहे.

पुण्यात ‘ई-चलना’द्वारे वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड भरण्यास नागरिकांची न्यायालयात गर्दी !

ई-चलन भरण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात सकाळपासून गर्दी केली होती; परंतु दंडाचे प्रकरण निकालात काढण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

नक्षलवादाविषयीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देहली येथे जाणार !

केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ सप्टेंबर या दिवशी देहली येथे दौर्‍यावर जाणार आहेत.

राज कुंद्रा यांची ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता !

अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले उद्योजक राज कुंद्रा यांची न्यायालयाने ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.

दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांना बदलीची धमकी देणारा तोतया पोलिसांच्या कह्यात !

पोलीस उपअधीक्षकांना १५ दिवसांत बदली करण्याची धमकी देणारा, तसेच पोलीस निरीक्षकांवर अरेरावी करणारा तोतया पोलीस संदीप लगड याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चिखली (जिल्हा बुलढाणा) येथे अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करून आरोपी पसार

नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या थांबवण्यासाठी बलात्कार करणार्‍यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !

महापालिकेच्या आरोग्य विभागातील तरुणाकडून चोरीचे २१ भ्रमणभाष जप्त

समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !