निरंजनी आखाड्याकडून हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे.

हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर कपिल देव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.

हरिद्वार येथे वादळीवार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात हानी

कुंभक्षेत्रातील संत आणि भक्त यांच्या निवासस्थानाचीही हानी झाली आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)

‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’चा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याण होईल ! – नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला

सर्व साधू आणि महात्मे यांनी धर्मावरील आघातांच्या विरोधात प्रखरतेने अन् संघटितपणे लढणे आवश्यक ! – अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी, श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर 

हिंदु जनजागृती समितीद्वारे श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी यांची भेट घेतली गेली.

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात जागृती करण्याची आवश्यकता ! – महामंडलेश्‍वर बालयोगी आचार्य श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज

हिंदूंच्या अनेक संस्था असल्या, तरी समाजात जाऊन लोकांना जागृत करून त्यांना संघटित करणे आवश्यक ! देशात सहस्रो पशूवधगृहे असून त्यांचा विरोध करायला हवा.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची घेण्यात आली भेट !

समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे ! – श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज, श्री आनंदाश्रम, हरिद्वार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. सर्व संत एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांनी केले.

कुंभमेळ्याची तुलना मरकज प्रकरणाशी करू नका ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत

कुंभमेळा आणि तबलिगी जमात या दोन प्रकरणांची तुलना करू नका. हरिद्वारमध्ये गंगानदीच्या किनारी १६ पेक्षा अधिक घाट आहेत. यांची तुलना देहलीच्या निझामुद्दीन मरकजशी करू नका.

(म्हणे) ‘हिंदूंनी मुसलमानांंची क्षमा मागावी !’-कुंभमेळ्यातील गर्दीवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट

संपूर्ण देशात आतंकवाद पसरवल्याविषयी मुसलमानांना हिंदूंची क्षमा मागायला राम गोपाल वर्मा यांनी कधी सांगितले आहे का ? कुंभमेळ्यावर टीका करायची आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाविषयी मात्र मूग गिळून गप्प बसायचे, हा हिंदुद्वेष होय !