हरिद्वार (उत्तराखंड) – येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशातून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. त्यांना उपचारासाठी डेहराडून येथील कैलाश रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. कुंभमेळ्यात गेल्या ७२ घंट्यांमध्ये दीड सहस्रांहून अधिक भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, तसेच अनेकांचा मृत्यू झाला आहे.