रासायनिक पाणी सोडल्याने पंचगंगेच्या पाण्याला उग्र वास !
वर्षानुवर्षे पवित्र नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणार्यांवर कठोर कारवाई न करणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
वर्षानुवर्षे पवित्र नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणार्यांवर कठोर कारवाई न करणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने एस्.टी.च्या मध्यवर्ती बसस्थानकात सजवलेल्या पालखीत रोपे ठेवून वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रत्येक प्रवाशाने किमान एकतरी रोप लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.
अखिल भारत हिंदु महासभा, मराठा क्रांती चॅनेल, श्री प्रल्हाद दिनानाथ कारीकर सराफी दुकान, शारदा खाडे ज्योतिष मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जून या दिवशी स्वामी विवेकानंद आश्रम हॉल, मंगळवार पेठ या ठिकाणी एक दिवसीय ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यांना अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध व्हावे, असा उद्देश या शिष्यवृत्तीच्या निर्मितीमागे आहे,
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात २४ उमेदवार उभे होते, त्यापैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही रक्कम ४ लाख ३७ सहस्र ५०० रुपये इतकी आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या वतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्याभिषेकदिनाचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु धर्मामध्ये नदीला अनन्यसाधारण महत्त्व असून पंचगंगा नदीचे माहात्म्य अगदी पुराणांमध्येसुद्धा गौरवलेले आहे.
पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १० जून या दिवशी विभागीय लोकशाहीदिन झाल्यावर सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
ज्या लढतीकडे राज्याचेच नाही, तर देशाचे लक्ष होते, ती लढत म्हणजे बारामती येथील अजित पवार यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्यात झाली.
नवीन अभ्यासक्रमात ‘मेकॅनिकल ॲन्ड मेकॅट्रॉनिक्स’, ‘इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर’, ‘कम्प्युटर सायन्स’, ‘कम्प्युटर सायन्स (ए.आय.एम्.एल्.) हे उदयोन्मुख कल असलेले पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असतील.