मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात रस्ता बंद आंदोलन !

मुंबई येथे छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी चालू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर शहरात दसरा चौक आणि रंकाळा बसस्थानक परिसर येथे २८ फेब्रुवारी या दिवशी रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

पंचगंगेच्या रूकडी (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर शेकडो मृत माशांचा खच !

हिंदूंच्या गणेशोत्सव, तसेच अन्य सणांमुळे प्रदूषण होते, अशी आरोळी ठोकणारे कथित पर्यावरणप्रेमी, तसेच अंनिससारख्या संघटना अशा वेळी गप्प बसतात, यातून हे सर्व हिंदुद्वेषी आहेत, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते  काय ?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर आणि सांगली येथे अभिवादन !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना कोल्हापूर आणि सांगली येथे अभिवादन करण्यात आले त्याचा चित्रमय वृत्तांत . . .

दिशा सालियनच्या मृत्यूचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले ? हे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल. यात कोण गुंतले आहे आणि कोण कारागृहात जाणार हे स्पष्ट होईल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने संयुक्त उत्तरेश्वर पेठ-शुक्रवार पेठेतील ‘शिवाई ग्रुप’च्या वतीने शिवगर्जना !

महाराष्ट्र धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केले. एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहून महाराज त्याची निवड करत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक भारतीयाला प्रेरक वाटत आले आहे.

विशाळगडच्या समस्येसंदर्भात लक्ष घालीन आणि जिल्हाधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देईन ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री, महाराष्ट्र राज्य

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन

कोल्हापूर येथे शिवजयंती मिरवणुकांना अनुमती नाही !

पेठेतील नागरिक आणि शिवभक्त मिरवणूक काढण्यावर ठाम !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे मोहीम !

नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

कोल्हापुरात ‘जयप्रभा स्टुडिओ’ची विक्री झाल्याचा प्रकार उघड : विविध संघटनांचे आंदोलन

कोल्हापुरातील ‘जयप्रभा स्टुडिओ’ची विक्री झाल्याचा प्रकार काल उघडकीस आला. खरेदी करणार्‍यांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या मुलांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. या स्टुडिओत भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणी होत होती.

कोरोना संसर्गाच्या संदर्भातील निर्बंध आता अल्प केले जातील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

केंद्र आणि राज्य यांच्या ‘टास्क फोर्स’शी चर्चा करून ‘मास्क’विषयी पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात पत्रकारांना दिली.