लहानपणापासूनच पालकांनी धर्मांधतेचे आणि मुसलमानेतरांच्या द्वेषाचे शिक्षण दिले !

ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशांच्या माजी आतंकवाद्याची पोलिसांत तक्रार !

  • जगभरात एका विशिष्ट पंथाचे लोक आतंकवादाकडे का वळतात किंवा धर्मांध मनोवृत्तीचे का होतात, यावर या घटनेमुळे नक्कीच प्रकाश पडला आहे. आता या माजी आतंकवाद्याचे आरोप कसे चुकीचे आहेत, हे सांगण्यास इस्लामी संघटना आणि त्यांचे समर्थक पुढे येतील !
  • मुसलमान मुलांवर जिहादचे बाळकडू कुठे मिळते, तेच यातून स्पष्ट झाले आहे. जगाने आणि भारतातील तथाकथित निधर्मीवाद्यांनी याकडे डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे अन् जगभरातील अशा मुलांवर घरी कसे संस्कार केले जातात, यावर आता लक्ष ठेवले पाहिजे !  
  • धर्मांधांच्या घरातच नव्हे, तर मदरशांमध्ये दिल्या जाणार्‍या शिकवणीतूनही  आतंकवादी निर्माण होतात, असे अनेक घटनांतून उघड झालेले असतांना तेथे कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, याचाही आता गांभीर्याने विचार केला पाहिजे !

लंडन – येथील पाकिस्तानी वंशाच्या एका २९ वर्षीय माजी जिहादी आतंकवाद्याने स्वतःच्या पालकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. ‘माझ्या आईवडिलांनी मी ५ वर्षांचा असल्यापासून मला धर्मांधतेची शिकवण देण्यास प्रारंभ केला. इस्लामसाठी लढण्याची, मुसलमानेतरांचा द्वेष करण्याचे, तसेच जिहादी सलाफी विचारणीच्या अंतर्गत ब्रिटनच्या विरोधात युद्ध करण्याचे शिक्षण दिले’, असे त्याने तक्रारीत केला आहे. ‘माझे भाऊ आणि बहीण हेही जिहादी विचारसरणीचे झाले आहेत’, असेही त्याने सांगितले. अल कायदाचा आतंकवादी अलनवर अल अवलाकी याचे मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करण्यासाठी वर्ग आयोजित केले जात असता. त्यातही या आतंकवाद्याने सहभाग घेतला होता. अवलाकी येमेन येथे ठार झाला. ब्रिटनच्या आतंकवादविरोधी पथकाने या माजी आतंकवाद्याची चौकशी करून त्याला सुरक्षित स्थळी ठेवण्याची सिद्धता केली आहे. या माजी आतंकवाद्याचे नाव समजलेले नाही.

माजी आतंकवाद्याने सांगितले, ‘माझे पालक सांगत होते की, इस्लामच्या विरोधात युद्ध चालू आहे. मला माझ्या देशाच्या विरोधात युद्धाला सिद्ध झाले पाहिजे. गेल्या ५ वर्षांपासून मी त्यांच्या संपर्कात नाही.’