(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !

जर्मन आस्थापन चीनमधून बाहेर पडून भारतात येणार

लावा इंटरनॅशनल या आस्थापनानंतर आता जर्मनीचे आस्थापन वॉन वेल्सनेही चीनमधील व्यवसाय बंद करून तो भारतात चालू करण्याचा निर्णय घेतला. हे आस्थापन बुटांचे उत्पादन करते.

भारत सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगवू शकतो, या भीतीने पाकच्या लढाऊ विमानांची आकाशात गस्त

काश्मीरच्या हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे कर्नल, मेजर आणि अन्य सैनिक हुतात्मा झाल्याचा सूड भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून घेऊ शकतो,

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे जाणा !

जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाच्या अरब देशांतील शाखेने भारतीय मुसलमान आणि त्यांच्यातील विद्वान यांना ‘मुसलमानांशी भेदभाव होत असल्याने भारताच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन जिहाद करण्यासाठी संघटित व्हा’, असे हिंदुद्वेषी आवाहन केले आहे.

 पाकिस्तानमध्ये दोघा हिंदु मुलींचे अपहरण

एका मुलीचे धर्मांतर करून ४० वर्षीय मुसलमान व्यक्तीसह लग्न लावून दिल्याचे उघड

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवणार्‍यांना ‘आतंकवादी’ ठरवणार !

अमेरिकेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता नवा नियम लागू केला आहे. अमेरिका ज्या प्रमाणे याकडे गांभीर्याने पहाता आहे, ते पहाता भारतियांनी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे !

कोरोनामुळे अमेरिकेत होऊ शकतो ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू ! – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर कोरोनाचे केंद्र बनले आहे. प्रतिदिन येथे बाधित आणि मृत्यू झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

स्पेनमध्ये अंत्यविधी थांबवल्याने शवागारात मृतदेह ठेवायला जागा नाही !

कोरोनामुळे युरोपातील इटली आणि स्पेन या देशांत प्रतिदिन मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तेथे रुग्णालयांत भरती होण्यापूर्वीच अनेक जणांचा मृत्यू होत आहे.

कोरोनामुळे झालेली परिस्थिती आता सुधारेल ! – नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट

कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आहे. आता परिस्थिती सुधारेल, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट ‘लॉस एंजिल्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

कोरोनामुळे जगभरात वर्ष २००९ पेक्षाही मोठी आर्थिक मंदी येईल ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

कोरोनाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या आर्थिक हानीचा फटका बसला आहे. त्यामुळे विकसनशील देशांना साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.