कोरोनामुळे अमेरिकेत होऊ शकतो ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू ! – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

चित्र सौजन्य : ‘द सन’

न्यूयॉर्क – अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर कोरोनाचे केंद्र बनले आहे. प्रतिदिन येथे बाधित आणि मृत्यू झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत ३७ सहस्रांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ३८५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अमेरिकेत ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन’ने संशोधनानंतर व्यक्त केली.

‘जर या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले नाही, तर एप्रिल आणि मे मासात प्रतिदिन २ सहस्र ३०० जणांचा मृत्यू होऊ शकतो’, अशी शक्यताही या संस्थेने वर्तवली आहे.