पाकिस्तानमध्ये दोघा हिंदु मुलींचे अपहरण

  • एका मुलीचे धर्मांतर करून ४० वर्षीय मुसलमान व्यक्तीसह लग्न लावून दिल्याचे उघड

  • पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून या मुलींच्या कुटुंबियांना धमक्या

पाकमधील हिंदू असुरक्षित आहेत, हे सातत्याने अशा घटनांतून समोर येत असतांना जागतिक स्तरावर कुणीही याची नोंद घेऊन त्यांच्यासाठी काहीही करत नाहीत. दुसरीकडे भारतात मुसलमानांच्या विरोधात काहीही झालेले नसतांना जागतिक इस्लामी संघटना लगेच त्यांची बाजू घेण्यासाठी पुढे येतात, हे लक्षात घ्या !

चुंडीको (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील चुंडीको शहरात दोघा हिंदु मुलींचे अपहरण करून एका मुलीचे ४० वर्षीय मुसलमान व्यक्तीशी लग्न करून दिल्याची घटना घडली. या घटनेचा वर्ल्ड सिंधी काँग्रेसने निषेध केला आहे. पाकिस्तान सरकारने तात्काळ कठोर पावले उचलून या मुलींची सुटका करून त्यांना त्याच्या पालकांकडे सोपवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या अपहरणामागे स्थानिक खासदार पीर फैसल शाह जीलानी यांच्या भावाचा सहभाग असल्याचा आरोप हिंदूंकडून करण्यात आला आहे.

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना वर्ल्ड सिंधी काँग्रेसच्या प्रमुख रूबीना ग्रीनवुड यांनी लंडनवरून म्हल्या, पाकमध्ये रहाणार्‍या सुथी आणि शमा या दोघा बहिणींचे सार्वजनिक ठिकाणावरून याच आठवड्यात अपहरण करण्यात आले. स्थानिक पोलिसांनी या विषयीचा गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. यातील १४ वर्षी सुथी हिला नंतर न्यायालयात उपस्थित करून तिने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे आणि ४० वर्षीय मुसलमान व्यक्तीशी लग्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शमा अद्यापही बेपत्ता आहे. पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून या मुलींच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. पीडितांचा आरोप आहे की, पोलीस, न्याययंत्रणा आण राजकारणी हे अपहरण करणार्‍यांसमवेत आहेत. यामुळे येथील सिंधी असहाय्य असून ते त्यांच्या मुलींच्या रक्षणासाठी सिंध प्रांतातून विस्थापित होऊ इच्छित आहेत. यासाठी आता सरकारने त्यांना साहाय्य करावे. हे प्रकरण आम्ही जागतिक स्तरावर उपस्थित करू आणि पीडितांना न्याय मिळवून देऊ.