स्पेनमध्ये अंत्यविधी थांबवल्याने शवागारात मृतदेह ठेवायला जागा नाही !

रोम (इटली) – कोरोनामुळे युरोपातील इटली आणि स्पेन या देशांत प्रतिदिन मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तेथे रुग्णालयांत भरती होण्यापूर्वीच अनेक जणांचा मृत्यू होत आहे. स्पेनची राजधानी माद्रीद येथे अंत्यविधी थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे शवागारात मृतदेह ठेवण्यासाठीही जागा उरलेली नाही. मृतदेह बर्फाच्या खोलीत ठेवण्यात येत आहेत. स्पेनमधील रुग्णालयांत अतीदक्षता विभागात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. कोरोनामुळे स्पेनमध्ये आतापर्यंत ४ सहस्र ८९ जणांचा मृत्यू झाला आहे.