अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवणार्‍यांना ‘आतंकवादी’ ठरवणार !

अमेरिका ज्या प्रमाणे याकडे गांभीर्याने पहाता आहे, ते पहाता भारतियांनी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता नवा नियम लागू केला आहे.

अमेरिकेचे डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल जेफरी रोसेन

या नियमानुसार ‘कोरोनाचा संसर्ग जाणीपूर्वक पसरवणार्‍यांना आता ‘आतंकवादी’ ठरवण्यात येणार असून तिला अटक केली जाईल.’ यशिवाय सदर व्यक्ती दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास तिला जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद या नियमात करण्यात आली आहे. अमेरिकेचे डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल जेफरी रोसेन यांनी ही माहिती दिली.