लांजा तालुक्यातील केदारलिंग आणि गांगेश्‍वर मंदिरांतील दानपेटी फोडल्या

तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्‍वर दानपेटी फोडून अनुमाने ३ सहस्र ५०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

समाज आणि सभ्यता यांच्या विकासात मंदिरांची मोठी भूमिका ! – मद्रास उच्च न्यायालय

मंदिरांचे अस्तित्व त्यांच्या आत केल्या जाणार्‍या वेदपठण, भजन, नृत्य, नाटक, कीर्तन इत्यादी उपक्रमांच्या सहअस्तित्वाशी जोडलेले आहे. एक उपक्रम अल्प झाल्यामुळे इतर उपक्रमही अल्प होतात आणि शेवटी मंदिरेच नष्ट होतात ! – मद्रास उच्च न्यायालय

लाहोर (पाकिस्तान) येथील शहीद गंज भाई तारू सिंह गुरुद्वार हे मशीद असल्याचा दावा करत मुसलमानांनी त्यास ठोकले टाळे !

अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे बलपूर्वक कह्यात घेऊन त्याची मशीद बनवण्याचाच मुसलमानांचा इतिहास असल्याने वर्तमानातही ते तसेच करत आहेत.

सावर्डे (तालुका चिपळूण) येथे श्री केदारनाथ आणि देवी मरीआई मूर्तींची विटंबना

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! देवतांच्या मूर्तींची विटंबनेची घटना, हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !

मेरठ येथे मंदिरात तोडफोड करणारा आरोपी कह्यात

देवतांच्या मूर्तींचीही तोडफोड
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

बांगलादेशमध्ये आतंकवाद्यांकडून शिवलिंगाची तोडफोड

लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यामध्ये तिस्ता बाजार परिसरातील शिवमंदिरावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले.

बांगलादेशात श्री कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड !

बांगलादेशातील हिंदू आणि हिंदूंची धार्मिक स्थळे असुरक्षित !

किकली (जिल्हा सातारा) येथील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी !

भुईंज येथील किकली गावातील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी झाली आहे. अनुमाने १५ सहस्र रुपयांची पंचधातूची चांदीचा मुलामा दिलेली प्रभावळ चोरांनी उखडून नेली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले आहे.

मांढरदेव (जिल्हा सातारा) येथील श्री काळेश्‍वरीदेवीच्या मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न !

अज्ञात व्यक्तींनी वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्‍वरी मंदिरात असलेल्या ३ लहान-मोठ्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला. ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. देवस्थानचे सचिव रामदास खामकर यांनी वाई पोलिसांत याविषयी तक्रार प्रविष्ट केली आहे.

जगभरातील हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कधी होणार ?

पाकच्या सिंधमधील तलाहीजवळील गावात रामापीर हे हिंदु मंदिर जेसीबी यंत्राद्वारे पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ पाकमधील हिंदु संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नरेंन दास भील यांनी प्रसारित केला आहे.