किकली (जिल्हा सातारा) येथील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी !

मंदिर पुरातत्व विभागाकडून संरक्षित

सातारा, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – भुईंज येथील किकली गावातील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी झाली आहे. अनुमाने १५ सहस्र रुपयांची पंचधातूची चांदीचा मुलामा दिलेली प्रभावळ चोरांनी उखडून नेली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले आहे.

पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. तातडीने अन्वेषणासाठी पोलीस पथके पाठवण्यात आली. या वेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे म्हणाले की, चोर भुरटे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच यापूर्वीही देवस्थान ट्रस्टला सी.सी.टी.व्ही. छायाचित्रक बसवण्याविषयी, रात्री गस्त घालण्याविषयी सूचना करूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. (पोलिसांना सी.सी.टी.व्ही. आणि रात्रीच्या गस्तीचे कारण देऊन  उत्तरदायित्व झटकता येणार नाही. हिंदूंच्या मंदिरांमध्ये चोर्‍या करण्याची हिंमतच चोरांमध्ये होणार नाही, असा पोलिसांचा धाक का नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

राज्यातील मंदिरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी कायदा-सुव्यवस्थेचा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?