लाहोर (पाकिस्तान) येथील शहीद गंज भाई तारू सिंह गुरुद्वार हे मशीद असल्याचा दावा करत मुसलमानांनी त्यास ठोकले टाळे !

शहीद गंज भाई तारू सिंह गुरुद्वार

लाहोर (पाकिस्तान) – येथील प्रसिद्ध शहीद गंज भाई तारू सिंह यांच्या नावाच्या गुरुद्वाराला पाकच्या ‘इवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ने मुसलमानांच्या साहाय्याने टाळे टोकले. यामुळे शिखांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मुसलमानांचे म्हणणे आहे की, हा गुरुद्वारा पूर्वी मशीद होती. येथे पूर्वी औरंगजेबचा मोठा भाऊ दारा शिकोह याचा महाल होता. विशेष म्हणजे २ वर्षांपूर्वीही या गुरुद्वाराला टाळे ठोकण्यात आले होते. तेव्हा भारताने तीव्र आक्षेप घेतल्यावर तो काढण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे बलपूर्वक कह्यात घेऊन त्याची मशीद बनवण्याचाच मुसलमानांचा इतिहास असल्याने वर्तमानातही ते तसेच करत आहेत. ही मानसिकता कायमची नष्ट करण्यासाठी संपूर्ण जगाने याविरोधात उभे ठाकण्याची आवश्यकता आहे !