मांढरदेव (जिल्हा सातारा) येथील श्री काळेश्‍वरीदेवीच्या मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

सातारा, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – अज्ञात व्यक्तींनी वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्‍वरी मंदिरात असलेल्या ३ लहान-मोठ्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला. ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. देवस्थानचे सचिव रामदास खामकर यांनी वाई पोलिसांत याविषयी तक्रार प्रविष्ट केली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, ४ नोव्हेंबरच्या उत्तररात्री २ वाजता चोरांनी मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न केला. तोंडाला काळे फडके लावलेला चोर दानपेटी फोडतांना सीसीटीव्ही छायाचित्रकात कैद झाला आहे. याविषयी वाई पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज कह्यात घेतले असून त्या दिशेने तपास चालू केला आहे. असे असले, तरी सीसीटीव्ही आणि स्वतंत्र सुरक्षारक्षक असूनही, तसेच मंदिर कुलूप बंद असूनही मंदिरात चोर शिरलाच कसा ? असा प्रश्‍न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.