पोलीस आणि गोरक्षक यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना अटक करून अवैध पशूवधगृह बंद करण्यात यावे !

येथील अवैध पशूवधगृहावर कारवाईसाठी गेलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी संबंधित अवैध पशूवधगृह बंद करून आक्रमकांना तात्काळ अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

श्री तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थ कुंडाच्या बाजूचे स्वछतागृह हटवा ! – हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

एका शक्तीपिठाच्या ठिकाणी पवित्र गोमुख तीर्थाच्या कुंडाच्या शेजारी स्वच्छतागृह बांधून मंदिर समिती त्याचे पावित्र्य भंग केले आहे. त्यामुळे मंदिर समितीने हे स्वच्छतागृह तेथून तात्काळ हटवणे आवश्यक आहे !

कालिपुत्र कालिचरण महाराज यांची सुटका करून त्यांच्यावर लादलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रहित करण्यात यावा !

या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.

जळगाव येथे तुळशीपूजन आणि तुळशीच्या रोपांचे वाटप !

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते तुळशीपूजन

श्री स्वामी समर्थांनी हिंदु जागृतीसाठी बळ द्यावे ! – धनंजय देसाई

हिंदूंनी संघटित शक्ती दाखवून दिल्यास हिंदूंवर अत्याचार करणार्‍यांना जरब बसेल. श्री स्वामी समर्थांनी समस्त हिंदूंना जागृत करण्यासाठी आम्हास बळ द्यावे, अशी प्रार्थना धनंजय देसाई यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी केली.  

पळसखेड पिंपळे (जिल्हा जालना) येथे शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभा !

भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे गावात शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवचरित्रातून जनजागृती करण्यात आली.

श्रीराम सेना, हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी बेळगाव येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला !

या घटनेतून देशभरात धर्मांतरबंदी कायदा करण्याची आणि त्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट होते !

हिंदु राष्ट्र सेना हिंदु युवकांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यास कटीबद्ध ! – मोहन तिवारी, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, हिंदूराष्ट्र सेना

येणारा काळ हा आपत्काळ आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र सेना हिंदु युवकांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यास कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. मोहन तिवारी यांनी केले.

शिवसेना आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या प्रयत्नांमुळे दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेरील हनुमान मंदिरावरील कारवाईला रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती !

दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पुरातन मारुति मंदिर अनधिकृत असल्याचे घोषित करून रेल्वे प्रशासनाकडून ते पाडण्यात येणार होते. त्याविषयी ३१ जुलै या दिवशी रेल्वे प्रशासनाकडून मंदिराच्या विश्‍वस्तांना नोटीस पाठवून ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

जळगाव येथील भुईकोट किल्ल्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवलेली मोहीम !

मुंबईमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी ‘ट्वीट्स’ करून या ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रप्रेमींनी ‘प्लाकार्ड’द्वारे या आंदोलनात सहभाग घेऊन किल्ल्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची, तसेच किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी केली.