श्री स्वामी समर्थांनी हिंदु जागृतीसाठी बळ द्यावे ! – धनंजय देसाई

श्री. धनंजय देसाई

अक्कलकोट, १७ डिसेंबर (वार्ता.) – भारतामध्ये हिंदुत्वाची ज्वाला अखंड प्रज्वलीत रहावी, धर्माभिमान जागृत व्हावा, यासाठी प्रत्येक हिंदू जागृत होणे आवश्यक आहे. देशात प्रतिदिन हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. हिंदूंनी संभाव्य धोके लक्षात घेऊन संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी संघटित शक्ती दाखवून दिल्यास हिंदूंवर अत्याचार करणार्‍यांना जरब बसेल. श्री स्वामी समर्थांनी समस्त हिंदूंना जागृत करण्यासाठी आम्हास बळ द्यावे, अशी प्रार्थना ‘हिंदु राष्ट्र सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी केली.

धनंजय देसाई यांनी १३ डिसेंबर या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. या वेळी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ बेंद्रे, देवीदास गवंडी, आप्पा गवळी, ऋषिकेश लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. महेश इंगळे यांनी धनंजय देसाई यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन सत्कार केला.