‘ऑनलाईन’ जुगार थांबवा !

‘भरघोस आर्थिक उत्पन्नासाठी राष्ट्र रसातळाला गेले तरी चालेल’, ही वृत्ती सध्या जोर धरत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन जुगार थांबवण्याविषयी योग्य ती कठोर पावले उचलायला हवीत, अन्यथा जुगारामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम भयावह असून त्यामुळे राष्ट्राची सर्व प्रकारे हानी होऊ शकते. असे झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

‘उगवत्या सूर्या’तील भारत !

योग्य संधी साधून पंतप्रधान मोदी यांनीही सुगा यांचे याविषयी कौतुक करून त्यांना अन् त्यांच्या खासदारांना यंदाचा गणेशोत्सव पहाण्यासाठी भारतात आमंत्रित केले. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे भारतात वहात असून भारताबाहेरही अशा प्रकारे त्याचे पडसाद उमटत आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी !

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

संतांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही उरलेले पदार्थ कुणीही खाऊ नयेत. उरलेले पदार्थ अन्य पाहुण्यांनाही देऊ नये; कारण भारतीय संस्कृतीत अतिथींना देव मानले जाते.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णा कक्षातील साहित्य व्यवस्थित आवरून झोपावे. सकाळी पसारा नसल्याने किडे, किटाणू आणि उंदीर हेही रात्री तेथे फिरकत नाहीत. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवल्यास अनिष्ट शक्ती ते खरकटे अन्न ग्रहण करतात. त्यातून अन्नपूर्णाकक्ष आणि ती भांडी दोन्हीही दूषित होतात.

वळवई येथे कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

कीर्तन म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच आहे. कीर्तन हे सुसंस्कारित पिढी घडवण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे.

सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ !

हरियाणात ५ सहस्र वर्षांपूर्वीची दागिने बनवण्याच्या मोठ्या व्यवसायाची जागा नुकतीच मिळणे किंवा तमिळनाडूत ४ सहस्र २०० वर्षांपूर्वी लोखंड वापरले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात सांगणे यांसारख्या गोष्टी हिंदु संस्कृतीची महानता पुन:पुन्हा सिद्ध करत आहेत. असे असतांना अरिफ खान यांना ‘हीच गोष्ट योग्य शिक्षणाद्वारे शिकवली गेली पाहिजे’, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे !

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले !

बद्रीनाथ धाम १ सहस्र २०० किलो वजनाच्या फुलांनी सजवण्यात आले आहे.

ब्राह्मणांनो, धर्मकर्तव्य बजावून कार्यक्षम व्हा !

ब्राह्मणद्वेष आणि शिवीगाळ यांमुळे व्यथित झालेल्या ब्राह्मण सहकाऱ्यांनी घाबरून जाऊन उगीच चिंता करू नये. अर्जुन विषादाचा त्याग करून ब्राह्मणद्वेष्ट्यांच्या सूत्रांचे खंडण करणे, हे आपले कर्तव्य आहे. समाजाला दिशा देणे, हे आपले कर्तव्य आहे आणि या कर्तव्याकडे आपण पाठ फिरवली; म्हणूनच आपल्याला समाज शिव्या घालतो आहे, हे समजून घ्या.

संस्कारांचे बाजारीकरण नको !

धर्मशिक्षण न दिल्याने विवाह संस्कारासारख्या सुंदर संस्कारांचे बाजारीकरण होऊन अनेकांचे जीवन, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. हे बाजारीकरण थांबवण्यासाठी आणि संभाव्य तोटे लक्षात घेऊन सरकारने आतातरी मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.

आज अक्षय्य तृतीया !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.