३१ टक्के मुंबईकर मनोरुग्ण !

गेल्या २ वर्षांत महानगरपालिकेची रुग्णालये आणि दवाखाने यांमध्ये जाऊन ७३ लाख ७४ सहस्र ०२ रुग्णांच्या माहितीवर आधारित अभ्यास अहवाल नुकताच महापालिका प्रशासनास एका कार्यशाळेच्या निमित्ताने सादर केला.

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

एप्रिल आणि मे या दोन मासांचा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. शरिराची शक्ती, तसेच पचनशक्तीही न्यून झालेली असते. या काळात नाकातून रक्तस्राव होणे (घुळणा फुटणे), उन्हाळे लागणे (लघवीला जळजळ होणे), घामोळे येणे, उष्माघात, डोळे येणे आदी विकार होतात.

अन्न आणि औषध विभागाकडून सदोष औषधांचे रुग्णांना वितरण

अन्न आणि औषध प्रशासनाकडून बाजारात नागरिकांसाठी उपलब्ध असलेले खाद्यान्न आणि औषधे गुणवत्ता पडताळण्याचे दायित्व आहे. बाजारात औषधे येण्यापूर्वी त्यांचे परीक्षण केले जाते

महाराष्ट्रात प्रतिवर्षी १ लाख ९० सहस्र क्षयाचे रुग्ण

राज्यात प्रतिवर्षी साधारणपणे १ लाख ९० सहस्र क्षयरुग्णांची नोंद होते. यापूर्वी केवळ सार्वजनिक रुग्णालयांमधून ही नोंद ठेवली जात होती; मात्र आता खासगी आरोग्य यंत्रणांकडूनही या रुग्णांची माहिती मिळवण्यास येते.

९३ प्रतिशत भारतियांना अपुरी झोप मिळते ! – नेल्सन स्टडीचा सर्वेक्षण अहवाल

अपूर्ण झोपेचे दुष्परिणाम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, त्याविषयी जनजागृती व्हावी, याकरिता १६ मार्च हा ‘जागतिक निद्रा दिन’ म्हणून पाळला जातो.

देवद आश्रमात साधकांवर औषधोपचार करण्यासाठी आयुर्वेदीय चिकित्सा करणारे वैद्य आणि पंचकर्म करणारे परिचारक यांची आवश्यकता !

साधकांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदीय चिकित्सा करणारे वैद्य, तसेच पंचकर्म करणारे परिचारक (‘थेरपिस्ट’) यांची तातडीने आवश्यकता आहे.

आधुनिक वैद्य जागृतीसाठी ‘प्रकल्प मूत्रपिंड’ हे अभियान देशात राबवणार 

मूत्रपिंडाशी संबधित विकारांविषयी सर्वसामान्यांमध्ये अद्याप जाणीव आणि जागृती नाही. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन महिला दिन आणि जागतिक मूत्रपिंड विकारदिनाचे औचित्य साधून त्यासाठी ’प्रकल्प मूत्रपिंड’ हे अभियान देशात राबवणार आहे. 

लोकप्रतिनिधी विमा योजना नि जनतेच्या पैशाची लूट !

‘सरकारने राज्यातील आजी-माजी आमदार आणि त्यांचे कुटुंबीय यांना विविध आजारांवर खासगी रुग्णालयांत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी नवीन विमा संरक्षण योजनेचा आरंभ केला आहे.

कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर !

६ मास ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य देशात पाचव्या क्रमांकावर असल्याविषयी लोकसेवा समितीच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

आवश्यक पालट !

भारतीय पशू संरक्षण संस्था परिषद या संस्थेंतर्गत व्हेजन सोसायटीच्या सदस्यांनी २५ फेब्रुवारीला गोव्यातील मिरामार येथे शाकाहार किती आवश्यक आहे, याविषयी लोकांमध्ये जागृती केली.


Multi Language |Offline reading | PDF