नाशिक येथे २ ठिकाणच्या धाडीत ५९ सहस्र रुपयांचा भेसळीचा माल जप्त !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ करणार्‍यांवर कायमस्वरूपी कारवाई केली, तरच भेसळीचे प्रकार थांबतील !

‘एन्.एम्.एम्.टी.’च्या कायम कर्मचार्‍यांसह कंत्राटी कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा योजना !

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची स्थापना वर्ष १९९६ मध्ये झाली; मात्र उपक्रमाला २३ वर्षे होऊनही येथे कार्यरत असलेल्या कायम तसेच ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली नव्हती.

होमिओपॅथी ‘स्वउपचारा’विषयीची मार्गदर्शक सूत्रे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.

खामगाव (बुलढाणा) येथे गणेशोत्सवकाळात ‘डीजे’ वाजवण्यास अनुमती नाही !

उत्सवकाळात डीजेमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवू नये, तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे. डीजेऐवजी मिरवणुकीत ढोल-ताशे, बँड-बाजा अशा प्रकारच्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ! – शिकागो विश्‍वविद्यालयाचा अहवाल

प्रदूषणामुळे देहलीतील नागरिकांच्या आयुर्मानात होत आहे ११ वर्षे ९ मास इतकी घट !

५ सहस्र किलो भेसळयुक्‍त पनीरचा साठा पुणे येथे जप्‍त !

भेसळ रोखण्‍यासाठी स्‍वतंत्र कायदे असतांना त्‍याची कठोर कार्यवाही न झाल्‍याचा परिणाम !

उज्ज्वला योजनेतील घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात

सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

उमदी (जिल्हा सांगली) येथील आश्रमशाळेत अनेक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !

काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहने यांमधून विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले.

‘योगा’ चळवळ म्हणून राबवणे आवश्यक ! – पालकमंत्री उदय सामंत

आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न रहाता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.

‘पेपर कप’ हे प्लास्टिकच्या कपासारखेच विषारी ! – नवे संशोधन

फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्‍या रसायनांचा परिणाम प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.