व्यायाम, शूज (बूट) आणि सांधे

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिदिन व्यायाम करतांना, वेगवेगळ्या ‘मॅरेथॉन’ (धावण्याची स्पर्धा), टेकडीवर चालायला जाणे या गोष्टी करतांना तुमचे शूज चांगले असावेत. चांगल्या सोलचे, पायाच्या आर्चला चांगला आधार देणारे आणि फार न झिजलेले असे शूज (बूट) वापरावेत.

खराब बूट तुमचे गुडघे आणि खुबा यांना ताण आणतात अन् त्यांच्यासंबंधीची दुखणी चालू होऊ शकतात. ज्यांना आधीपासून संधीवात किंवा आमवात, सांधे किंवा स्नायूंचे जुनाट दुखणे आहे, त्यांनी आणखी काळजी घ्यावी. सांध्यांसंबंधित पूर्वी अपघात वगैरे झाला असेल, तर हे सर्व त्रास परत चालू होतात. नव्याने उद्भवलेल्या सांध्याच्या दुखण्यामागे झिजलेले शूज हे कारणही असू शकते.

शूज सपाट ठिकाणी ठेवले असता ते डगमगून स्थिर होत असतील किंवा एका बाजूला झुकत असतील, तर लगेच नवीन शूज घ्यायची वेळ आली आहे, असे समजावे. सांधे, हाडे, केस आणि दात हे ‘रिप्लेस’ (पालटणे) करण्यापेक्षा ते ‘मेन्टेन’ (पालनपोषण) करण्यावर नेहमीच भर द्यावा.

– वैद्य स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद