१६८ वर्षे जुनी परंपरा असलेले १ सहस्र ८०० हून अधिक गायींचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील प्राचीन ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ !

वर्ष १८५५ ला स्थापन झालेली १६८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा असणारी, १ सहस्र ८०० हून गायींचा सांभाळ करणारी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ ही गोसंवर्धनासमवेत गोआधारित शेतीला प्रोत्साहन देणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्था !

गोरक्षक सागर श्रीखंडे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी वाचवले गायीचे प्राण !

राष्ट्रीय महामार्गावरील आरोरा आस्थापनाच्या शेजारी एका गायीला अज्ञात वाहनाने धडक बसल्याने तिचा पाय मोडला, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी ‘समाधी मठा’च्या गोरक्षक विभागाचे श्री. सागर श्रीखंडे यांना कळवली.

भोसरी (पुणे) येथे कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’चे आयोजन !

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी जनमित्र सेवा संघ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे..

लम्पी विषाणूच्या संसर्गातून बर्‍या झालेल्या २५ गायींसाठी उघडण्यात आले द्वारकाधीश मंदिर !

कच्छ येथील गोशाळेतील २५ गायींना २ मासांपूर्वी लम्पी या विषाणूचा संसर्ग झाला होता. त्या वेळी सौराष्ट्रात लम्पी विषाणूमुळे शेकडो गायींचा बळी गेला होता. त्यामुळे या गोशाळेचे मालक महादेव देसाई यांनी ‘गायी बर्‍या झाल्या, तर गायींसह दर्शनाला येईन’, असा नवस भगवान द्वारकाधीशाकडे (भगवान श्रीकृष्णाकडे) बोलला होता.

२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक जप्त !

२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक आमगाव पोलिसांनी १ नोव्हेंबरला पहाटे पकडला. ट्रकचालक आणि अन्य ४ आरोपी यांना पोलिसांनी कह्यात घेऊन ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला.

राज्यात ‘गोसेवा आयोग’ लागू करा !

गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यांत ज्याप्रमाणे ‘गोसेवा आयोग’ लागू आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ‘गोसेवा आयोग’ लागू करावा, अशी मागणी जळगाव येथील गोशाळा महासंघाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

गोवंशियांना गोशाळेत सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा !

‘१७.३.२०१९ या दिवशी परभणी ग्रामीण येथे एक फौजदारी गुन्हा नोंद झाला होता. १५ बैल आणि ३ म्हशी यांना छोट्या ट्रकमधून अतिशय दाटीवाटीने घेऊन जात असतांना गोतस्करांना पकडण्यात आले होते.

VIDEO – ‘हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍यालाच मतदान करू’, असे लोकप्रतिनिधींना ठामपणे सांगा ! – राजीव शाह, अध्यक्ष, सायबर सिपाही (दक्षिण राज्य) भाग्यनगर, तेलंगाणा

देशात दहशतवाद, आतंकवाद, भ्रष्टाचार, दरोडे आदी वाढत असतांना पोलीस ते सोडून हिंदु संघटनांच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत, हे हिंदूंचे दुर्देव आहे. भोपाळमध्ये हिंदु देवतांविषयी खोटा प्रसार करून हिंदूंचे  धर्मांतर केले जात आहे.

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा येतील.

पुणे (टिळेकरनगर) येथे गोवंशियांना वाचवण्यात यश !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही होत नसल्याने सातत्याने गोवंश हत्येच्या घटना घडत आहेत, हे दुर्दैवी !