२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक जप्त !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच परिणाम !

गोंदिया – २३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक आमगाव पोलिसांनी १ नोव्हेंबरला पहाटे पकडला. ट्रकचालक आणि अन्य ४ आरोपी यांना पोलिसांनी कह्यात घेऊन ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला. ट्रकमधील २३ गोवंशियांचे मूल्य ४.२० लाख रुपये सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ट्रकचालकावर प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंद केला. जप्त केलेल्या गोवंशियांना सालेकसा तालुक्यातील धानोली येथील श्री गुरुदेव बहुउद्देशीय सेवा अनुसंधान केंद्रात (गौशाळा) ठेवण्यात आले.