लोटे (खेड) येथील गोशाळेच्या जागेचा प्रश्न न सुटल्याने ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांचे आमरण उपोषण  

गोशाळेत सध्या ११०० गायी आहेत. त्यांच्या वैरणीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कीर्तनसेवेतून या गायींची सेवा केली जाते; मात्र त्यांचा दिवसाचा खर्च अनुमाने ६० सहस्र रुपये येतो. त्यामुळे हा खर्च परवडत नाही.

कणेरी मठ येथे ५० पेक्षा अधिक गायी मृत्‍यूमुखी पडल्‍या नसून केवळ १२ गोवंशियांचा मृत्‍यू ! – जिल्‍हा पशूसंवर्धन उपायुक्‍त

पुरोगामी आणि साम्‍यवादी यांना चपराक देणारा जिल्‍हा पशूसंवर्धन उपायुक्‍तांचा खुलासा !

कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट

पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोरोनावर गुणकारी असलेल्या पंचगव्य चिकित्सेला शासनमान्यता मिळणे आवश्यक ! – डॉ. दिलीप कुलकर्णी, कार्यवाह, जनमित्र सेवा संघ

पंचगव्य आधारित ओझोन प्रक्रियेद्वारे उपचार केल्यास कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मागील २ वर्षे सारे जग ज्या कोरोनामुळे त्रस्त आहे, त्यावरही पंचगव्य चिकित्सा प्रभावीपणे काम करते; परंतु याला पुढील काळात शासनमान्यता मिळणे आवश्यक आहे..

१६८ वर्षे जुनी परंपरा असलेले १ सहस्र ८०० हून अधिक गायींचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील प्राचीन ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ !

वर्ष १८५५ ला स्थापन झालेली १६८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा असणारी, १ सहस्र ८०० हून गायींचा सांभाळ करणारी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ ही गोसंवर्धनासमवेत गोआधारित शेतीला प्रोत्साहन देणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्था !

गोरक्षक सागर श्रीखंडे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी वाचवले गायीचे प्राण !

राष्ट्रीय महामार्गावरील आरोरा आस्थापनाच्या शेजारी एका गायीला अज्ञात वाहनाने धडक बसल्याने तिचा पाय मोडला, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी ‘समाधी मठा’च्या गोरक्षक विभागाचे श्री. सागर श्रीखंडे यांना कळवली.

भोसरी (पुणे) येथे कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’चे आयोजन !

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी जनमित्र सेवा संघ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे..

लम्पी विषाणूच्या संसर्गातून बर्‍या झालेल्या २५ गायींसाठी उघडण्यात आले द्वारकाधीश मंदिर !

कच्छ येथील गोशाळेतील २५ गायींना २ मासांपूर्वी लम्पी या विषाणूचा संसर्ग झाला होता. त्या वेळी सौराष्ट्रात लम्पी विषाणूमुळे शेकडो गायींचा बळी गेला होता. त्यामुळे या गोशाळेचे मालक महादेव देसाई यांनी ‘गायी बर्‍या झाल्या, तर गायींसह दर्शनाला येईन’, असा नवस भगवान द्वारकाधीशाकडे (भगवान श्रीकृष्णाकडे) बोलला होता.

२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक जप्त !

२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक आमगाव पोलिसांनी १ नोव्हेंबरला पहाटे पकडला. ट्रकचालक आणि अन्य ४ आरोपी यांना पोलिसांनी कह्यात घेऊन ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला.

राज्यात ‘गोसेवा आयोग’ लागू करा !

गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यांत ज्याप्रमाणे ‘गोसेवा आयोग’ लागू आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ‘गोसेवा आयोग’ लागू करावा, अशी मागणी जळगाव येथील गोशाळा महासंघाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.