जळगाव येथील गोशाळा महासंघाची मागणी
जळगाव, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यांत ज्याप्रमाणे ‘गोसेवा आयोग’ लागू आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ‘गोसेवा आयोग’ लागू करावा, अशी मागणी जळगाव येथील गोशाळा महासंघाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, गोसेवक, गोप्रेमी स्वखर्चाने गोसेवा करतात. देशी गायी आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशी गायींचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. आज देशात ९५० गोशाळा आणि पांजरपोळ आहेत. यातून १ लक्ष ८७ सहस्र गोवंशियांचे पालन केले जात असते. गोआधारित शेती करायची असेल, तर गोवंशहत्याबंदी कायदा त्वरित लागू झाला पाहिजे. या वेळी जिल्हाभरातील गोप्रेमी, गोसेवक उपस्थित होते.